मुंबईहून अगदी काही किलोमीटरच्या अंतरावर खोपोली येथे केपी धबधबा आहे.
हा धबधबा रेल्वे ट्रॅकच्या लगत असल्याने येथे जाताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
उंचावरून कोसळणारा पंधरा शुभ्र धबधबा आणि त्याच्या बाजूने जाणारी रेल्वे हा नजारा मंत्रमुग्ध करतो.
हा धबधबा ज्या डोंगरावरुन कोसळतो तेथे काही भाग हा गुहेसारखा आहे.
हा धबधबा खूप उंचावरून कोसळतो तसेच त्यामुळे तो पाहण्यास खूप आकर्षक दिसतो.
केपी धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मंकी केबिन रेल्वे स्थानकांपासून पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील नागनाथ रेल्वे स्थानकाकडे जाणे.
हा धबधबा रेल्वे ट्रॅकलगत आहे. येथे जाण्यासाठी रेल्वे ट्रॅकवरुन जावे लागते. यामुळे येथे स्वत:च्या रिस्कवरच जावं लागत.