फ्रीजमध्ये ठेवूनही दूध फाटतेय? हे उपाय करुन बघा!

दूध जास्त दिवस टिकण्यासाठी ते फ्रिजमध्ये ठेवले जाते

Mansi kshirsagar
Jul 04,2023


मात्र, दूध फ्रीजमध्ये ठेवत असताना काळजी घेण्याची गरज आहे


दूध उकळवल्यानंतर ते गरम असतानाच फ्रीजमध्ये ठेवू नका अन्यथा दुध फाटण्याची भीती असते


दूध उकळवल्यानंतर ते पूर्णपणे थंड करुनच ते फ्रीजमध्ये ठेवा


थंड झालेले दूध फ्रीजच्या कोणत्या भागात ठेवाताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे


दूध 4अंश सेल्सिअसच्या खाली ठेवावे, जेणेकरुन खराब होणार नाही


फ्रीजचा वरचा भाग हा सर्वात थंड मानला जातो. त्यामुळं नेहमी वरच्या भागातच दूध ठेवावे


फ्रीज अस्वच्छ असेल तर दूध खराब होते


फ्रीजमध्ये इतर पदार्थ खराब झाले असल्यास आधी ते काढून टाकावेत मगच दूध ठेवावे


दूध फ्रीजमध्ये ठेवताना त्यावर झाकण ठेवा. जेणेकरुन इतर पदार्थांचा वास दूधाला येणार नाही

VIEW ALL

Read Next Story