पावसाळा येताच त्वचेची व आरोग्याची काळजी घेण्याची गरज भासते
दमट हवामान आणि पाणी यामुळं पावसाळ्यात बॅक्टेरिया जास्त प्रमाणात फैलावतो
साचलेल्या पाण्यातील संसर्ग किंवा माती पायांमध्ये अडकून संसर्ग निर्माण होऊ शकतो
अशावेळी पावसाळ्यात पायांची जास्त काळजी घेण्याची गरज असते
पावसाळ्यात रोजच्यासाठी योग्य चप्पलांची निवड करा. अशावेळी रबर व प्लास्टिक फुटवेअर वापरणे कधीही चांगले
पायांची नखे वेळोवेळी कापा. नखांमध्ये माती व घाण जाऊन इन्फेक्शन होऊ शकते
पावसाच्या पाण्यातून चालत येत असाल तर घरी आल्यावर लगेचच पायांची साफ-सफाई करा
फंगल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी घरी आल्यावर कोमट पाणी करुन त्यात दोन चमचे मीठ टाका
या पाण्यात आता २० मिनिटे तरी पाय टाकून बसा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुवा
ओले कपडे व ओले शूज घालणे टाळा. तसंच, पाय शक्यतो कोरडे ठेवायचा प्रयत्न करा