कशी घ्याल तुमच्या पायाची काळजी?
पावसाच्या पाण्यामुळे अनेकदा संसर्ग (infection) होतो. खाज सुटणे, जखम होणे, पायाच्या बोटांच्या दरम्यान इन्फेक्शन होणे अशा समस्या उद्भवू शकतात.
ओलावा आणि घाणीमुळे त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे पायाची काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोण कोणते उपाय करू शकता?
अर्ध्या तासासाठी पाया मीठाच्या पाण्यातच ठेवावे. नंतर बाहेर काढून नीट कोरडे करावे. असं केल्यास सूज आणि इन्फ्केशन कमी होण्यास मदत होते.
बंद कापडी शूज किंवा चप्पल घालणं टाळा, कारण ते पाणी शोषून घेतात ज्यामुळे पायांमध्ये ओलावा जमा होतो. रबराच्या चपला वापरणं कधीही चांगलं.
पावसाळ्यात पायाची नखं वाढवणं टाळा कारण पायाची नखं वाढवणं ही मोठी चूक ठरू शकते.
तुमचं शरीर कोरडं आणि स्वच्छ ठेवा, विशेषत: ज्या भागात तुम्हाला खूप घाम येतो. तिथली स्वच्छता वेळोवेळी केली पाहिजे.
त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित आंघोळ करा. ओले कपडे आणि ओले शूज घालणे टाळा.
कडुनिंब हे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल असतं. कडुनिंबाची पाने घेऊन ती स्वच्छ धुवा पायावर पेस्ट करून लावल्याने इंफेक्शन कमी होतं.
ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अनेक अँटीफंगल गुणधर्म असतात, जे खाज आणि संसर्ग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.