मूड स्विंग होण्याचे कारण हे हार्मोनल इमबॅलेन्स आहे.
मूड स्विंग थांबवण्यासाठी फक्त तुम्ही आहारत थोडा बदल केला तरी त्याचा फायदा होईल.
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास मूड स्विंग होतात.
व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी रोज 10 मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरायला जा. आपल्या आहारात दूध, अंडी, संत्र्याचा रस आणि मशरूम यांचा समावेश करा.
शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तरी मूड स्विंग होतात. त्यासाठी पालक, केळी, भोपळ्याच्या बिया, शेंगा यांचा समावेश करू शकता.
व्हिटॅमिन बीची कमतरता देखील मूड स्विंग होण्याचे कारण असू शकते.
ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स मूड सुधारण्यास मदत करतात. तुम्ही तुमच्या आहारात मासे, अक्रोड आणि चिया सीड्सचा समावेश करू शकता.
मूड स्विंग टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या यानं तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल आणि मूड स्विंगची समस्या दूर होईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)