तळलेले पदार्थ खाणं टाळताय? ही रेसिपी वापरुन घरीच बनवा ऑईल फ्री समोसा

पाऊस सुरू झाल्यावर गरमा गरम भजी, समोसा खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, तेलात तळलेले पदार्थ खायचं तुम्ही टाळताय.

पण आता घरच्या घरीदेखील तुम्हाला ऑईल फ्री समोसा बनवता येऊ शकतो, जाणून घ्या रेसिपी

साहित्य

कप मैदा, २-४ उकडलेले बटाटे, १ कप पनीर, १/४ टीस्पून लाल मिरची पावडर, १/४ टीस्पून धणेपावडर, १ टीस्पून चाट मसाला, १/४ टीस्पून गरम मसाला, नमक स्वादानुसार

सगळ्यात पहिल्या एका भांड्यात मैदा, मीठ आणि गरजेनुसार पाणी चाकून पीठ मळून घ्या

तर एकीकडे बटाटे, पनीर, मिर्ची पावडर, मीठ, धणे पावडर, चाट मसाला, मगरम मसाला आणि मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करुन घ्या.

त्यानंतर छोट्या-छोट्या पुऱ्या लाटून घ्या व यात वरील मिश्रण टाकून त्रिकोणी आकाराचा शेप देऊन समोसा पॅक करुन घ्या

प्रेशर कुकरमध्ये मीठ टाकून एक मोठा जाळीचा स्टँड ठेवून कुकरची शिट्टी काढून १० मिनिटे गरम करा

एका ताटाला तूप लावून ठेवा. त्यानंतर समोसे त्या ताटात ठेवा

कुकर गरम झाल्यानंतर त्याच्या आत ठेवलेल्या स्टॅंडवर समोश्यांचे ताट ठेवा व कुकरचे झाकण बंद करा

15 ते 20 मिनिटे मध्यम आचेवर समोसे शिजवून घ्यावे. मात्र, त्याआधी कुकरची शिट्टी काढली आहे का याची खात्री करुन घ्या

VIEW ALL

Read Next Story