चिखलातून फिरल्यामुळं पाय काळवंडलेत; किचनमधील 'या' पदार्थांनी करा टॅनिंग दूर

उन्हाळ्यात त्वचा काळवंडण्याच्या समस्येला सर्वांनाच तोंड द्यावे लागते. पण तुम्हाला हे माहितीये का पावसाळ्यातही त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण पावसाळ्यात त्वचेवर फंगल इन्फेक्शन व टॅनिगची समस्या वाढते.

फंगल इन्फेक्शन

पावसाच्या पाण्यामुळं आणि चिखलातून चालण्यासाठी पायांना फंगल इन्फेक्शन होऊ शकते. अशावेळी पाय काळवंडलेले दिसतात. हे टॅनिंग दूर करण्यासाठी महिला पार्लरमध्ये पैसे खर्च करतात.

टॅनिग दूर करण्यासाठी

काळवंडलेल्या पायावरील टॅनिग दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळं पाय स्वच्छ आणि सुंदरही दिसतील त्याशिवाय निरोगीही राहतील.

दूध आणि क्रीम

पायावरील काळवंडलेपण दूर करण्यासाठी दूध आणि क्रीमचा वापर करा. दूध क्लिंजर म्हणून काम करते. एका वाटीत दूध आणि मलाई घेऊन त्याची पेस्ट करा आणि ती पायांना लावा. २ तासांनंतर पाय स्वच्छ धुवा

हळद आणि बेसन

हळद आणि बेसन याच्या मिश्रणानेही पायाचे टॅनिंग दूर होते. त्याचबरोबर डेड स्कीनही निघते. एका वाटीत बेसन, हळद आणि दही याचे मिश्रण घेऊन स्क्रब तयार करा आणि 20 मिनिटांनंतर पाय स्वच्छ धुवा

पपई

एका वाटीत पपईचा गर काढून घ्या त्यात मध मिसळून ती पेस्ट पायांवर लावा. त्यानंतर अर्धा तासानंतर पाय स्वच्छ धुवा

टोमॅटो

टोमॅटो टॅनिंग दूर करण्यासाछी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळं टोमॅटो आणि दह्यामुळं त्वचेला योग्य पोषणही मिळेल. टोमॅटोची साल काढून पेस्ट तयार करा त्यात दही मिसळा आणि ही पेस्ट पायांवर लावा. अर्धा तासानंतर पाय स्वच्छ धुवा

कोरफड

कोरफड ही त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. कोरफडीचा गर काढून तो त्वचेवर रोज लावा. एक आठवड्यानंतर फरक दिसून येईल

मुलतानी माती

पायांचा काळपटपणा घालवण्यासाठी मुलतानी मातीचाही वापर करु शकता. एक मोठा चमचा टॉमेटॉचा रस, अर्धा चमचा लिंबू आणि एक मोठा चमचा मध टाकून हा पॅक पायांवर लावा. नंतर छान मसाज देऊन पाय धुवून टाका

VIEW ALL

Read Next Story