कोण आहे कार्लोस अल्काराझ?

कार्लोस अल्काराझ यांचा जन्म 5 मे 2003 रोजी स्पेनमधील एल पालमार येथे झाला.

आजोबा, वडिलांकडून मिळाला वारसा

कार्लोसला टेनिसचा वारसा मिळाला. त्याचे आजोबा टेनिस क्लबचे पहिले सदस्य होते. त्याचे वडील कार्लोस अल्काराज गोन्झालेझ हे व्यावसायिक टेनिसपटू आहेत.

वयाच्या तिसऱ्या वर्षी हाती घेतले रॅकेट

अल्काराझ आणि त्याच्या इतर तीन भावांकडे लहानपणी टेनिस खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षीच अल्कराझने टेनिस खेळण्यास सुरुवात केली.

15 वर्षांपर्यंत वडिलांनीच दिले प्रशिक्षण

वयाच्या 15 व्या वर्षापर्यंत अल्काराजच्या वडिलांनी त्यांना प्रशिक्षण दिले. पण खेळ आणखी सुधारण्यासाठी जगातील नंबर-1 खेळाडू जुआन कार्लोस फेरेरोकडून प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

फेडररसोबत प्रशिक्षण

2019 मध्ये, रॉजर फेडरर विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याच्या तयारीसाठी जुआन कार्लोस फेरेरोसोबत सराव करत होता. यादरम्यान फेरेरोच्या सांगण्यावरून फेडररने अल्काराजसोबत सराव केला.

टेनिस कारकीर्द कशी होती?

फेब्रुवारी 2020 मध्ये, अल्काराझने रिओ ओपनमध्ये एटीपी मुख्य ड्रॉमध्ये पदार्पण केले. पुढील वर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे ग्रँडस्लॅममध्ये पदार्पण केले.

17 व्या वर्षीच मोठी कामगिरी

अल्काराझ 17 वर्षांचा होता तेव्हा तो ग्रँड स्लॅमच्या मुख्य ड्रॉसाठी पात्र ठरणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याने या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. यानंतर अल्काराझने माद्रिद ओपनची दुसरी फेरी गाठली. जिथे त्याने राफेल नदालचा सामना केला.

जोकोव्हिचच्या वर्चस्वाला शह

नोव्हाक जोकोव्हिचचे विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील हे वर्चस्व अखेर स्पेनचा 20 वर्षीय टेनिसपटू कार्लोस अल्कराझने संपुष्टात आणले.

जेतेपद मिळवून कार्लोस अल्काराझ झाला श्रीमंत

कार्लोस अल्काराझने विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आणि बक्षीस म्हणून मोठी रक्कम जिंकली. अल्काराझला विम्बल्डन जिंकल्यानंतर 25 कोटी रुपये मिळाले. तर उपविजेता नोव्हाक जोकोविचला 12.25 कोटी रुपये मिळाले. (सर्व फोटो - AP)

VIEW ALL

Read Next Story