शिव ठाकरे नात्यामुळे चर्चेत

बिग बॉसमधील (Big Boss) रनर अप आणि 'खतरो के खिलाडी'मधील (Khataron Ke Khiladi) स्पर्धक शिव ठाकरे सध्या आपल्या नात्यामुळे चर्चेत आहे.

सलमान खानच्या अभिनेत्रीला डेट करतोय शिव ठाकरे?

शिव ठाकरे सध्या बॉलिवूड अभिनेत्री डेजी शाहला (Daisy Shah) डेट करत असल्याचे दावे केले जात आहेत.

डेजी शाह सलमानची खास मैत्रीण

डेजी शाहने सलमान खानसह 'जय हो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून दोघांमध्ये चांगली मैत्री आहे. (Image: Viral Bhayani)

'खतरो के खिलाडी' मध्ये दिसले होते एकत्र

यानंतर डेजी शाह छोट्या पडद्यावर रोहित शेट्टीच्या 'खतरो के खिलाडी' कार्यक्रमात दिसली होती. (Image: Viral Bhayani)

शिव ठाकरे आणि डेजी शाह नात्यात?

याचवेळी शिव ठाकरे आणि डेजी शाह यांच्यात प्रेमसंबंध फुलले अशी चर्चा आहे.

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये फोटोग्राफर त्यांचा पाय खेचत आहेत.

व्हिडीओची चर्चा

शिव ठाकरे आणि डेजी एकाच गाडीतून आल्यानंतर फोटोग्राफर त्यांना जोडी चांगली आहे असं सांगतात. त्यावर शिव ठाकरे ती चांगली ड्रायव्हर आहे सांगतो.

खरंच नातं आहे की अफवा?

दरम्यान, त्यांचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांमध्येही काहीतरी शिजत असल्याची चर्चा रंगली आहे.

VIEW ALL

Read Next Story