शुद्ध गायीचे तूप हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आयुर्वेदातही तुपाचे फायदे सांगितले आहे. तुपामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होतं आणि आरोग्याला पोषण तत्त्वांचाही पुरवठा होतो. मात्र हल्ली बाजारात सर्रास शुद्ध तुपाच्या नावाखाली भेसळयुक्त तूप विकले जाते.
आजकाल नोकरी आणि धकाधकीच्या आयुष्यात घरात तुप कढवणे शक्य होत नाही. त्यामुळं सगळ्याच गोष्टी बाजारातून खरेदी केल्या जातात. अशावेळी तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखणे शक्य होत नाही. पण या एका ट्रिकमुळं तुम्ही सहज ओळखू शकता.
भेसळयुक्त तुपात वनस्पती तेल, वितळलेले लोणी आणि डालडा व हायड्रोजेनेटेड तेल वापरले जाते.
त्याचबरोबर यात बटाटा आणि रताळे कुस्करुन टाकण्यात येते.
शुद्ध तूप ओळखण्यासाठी एका भांड्यात एक चमचा तूप गरम करत ठेवा. जर तूप लगेच वितळलं आणि त्याला गडद तपकिरी रंग आला तर हे तूप शुद्ध आहे. पण जर तूप वितळण्यास वेळ लागत असेल आणि त्याल हलका पिवळा रंग आल्यास तूप भेसळयुक्त आहे.
पाण्याने भरलेल्या एका पाण्याच्या ग्लासात 2 चमचे तूप टाका जर तूप पाण्यावर तरंगत असेल तर तूप शुद्ध आहे
आपल्या हातावर एक चमचा तूप घ्या आणि थोड्या वेळाने ते आपोआप विरघळू लागल्यास तूप शुद्ध आहे
एका भांड्यात तूप वितळवत ठेवा त्यानंतर वितळलेले तूप दुसऱ्या जारमध्ये भरुन फ्रीजमध्ये ठेवा. जर तूप आणि नारळाच्या तेलाचा थर वेगवेगळ्या स्वरुपात जमा झाला तर तुप भेसळयुक्त आहे.