एखाद्या व्यक्तीसाठी झोप ही खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप न झाल्यास संपूर्ण वेळापत्रक बिघडू शकते.
दिवसभराची उर्जा मिळवण्यासाठी रात्रीची झोप खूप गरजेची आहे. झोप अपूर्ण राहिल्यास अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.
झोप पूर्ण न झाल्यास अनेक आजार वाढीस लागण्याची शक्यता असते. त्यामुळं निरोगी आयुष्यासाठी झोप गरजेची आहे.
पण तुम्हाला माहितीये का तुमच्या वयानुसार तुम्ही किती झोप घेतली पाहिजे.
सामान्यतः नवजात बालकांना झोपेची अधिक गरज भासते. तर, वृद्धांना कमी झोपेची आवश्यकता असते.
सेंट्रल फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेशन (CDC) च्या म्हणण्यानुसार, नवजात बाळांना 14-17 तास आणि आणि लहान मुलांना 12-16 तासांची झोप आवश्यक असते.
जवळपास 1 वर्षांच्या मुलांना 11 ते 14 तासांची झोप तर, 3-4 वर्षांच्या मुलांना 10-14 तासांची झोप गरजेची असते
जी मुलं शाळेत जातात त्यांना 9-12 तासांची झोप व पौगंडावस्थेत असलेल्या मुलांना 8-10 तासांची झोप आणि युवकांना 7-9 तासांची झोप गरजेची असते.