बहुतेक लोकांना सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.
काही लोक सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी किंवा लिंबू मिसळून पाणी पितात.
शरीराच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन लोकांना दिवसभरात 8-10 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लोकांनी किती ग्लास पाणी प्यावं हे जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास कोमट पाणी पिणं चांगलं असतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.
काही लोकांना कोमट पाण्याची समस्या असते, म्हणून त्यांनी साधारण 2 ग्लास पाणी प्यावं.