काखेतून दुर्गंधी येणं ही एक सामान्य समस्या असून यामुळे अनेकांना लाज वाटते. ही समस्या अनेक कारणांमुळे उद्भवू शकते, जसं की घाम येणं, बॅक्टेरियाचं इन्फेक्शन इ.
काही घरगुती उपायांबद्दल माहिती घेऊया ज्यामुळे तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता.
लिंबूमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टीरियल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. काखेवर लिंबाचा रस लावू शकता.
पाण्यात बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा आणि काखेत लावा. काही वेळाने धुवा.
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात.
व्हिनेगरमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात. तुम्ही पाण्यात व्हिनेगर मिसळून काखेवर स्प्रे करू शकता.