चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेक आजारांचा धोका वाढत असतो.
खराब कोलेस्ट्रॉल हा देखील एक प्रकराचा आजारच आहे.
पण तुम्हाला हे माहित आहे का सडपातळ लोकांना सुद्धा कोलेस्ट्रॉलचा धोका असू शकतो.
खराब कोलेस्ट्रॉल हे मेणासारखे शिरांमध्ये जमा होते. ज्यामुळे रक्ताभिसरणावरही खूप परिणाम होतो. कोलेस्ट्रॉल हे चांगले आणि वाईट असे दोन प्रकारचे असतात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते कोलेस्ट्रॉलची पातळी 150 mg/dl पेक्षा जास्त नसावी. तर एचडीएलची पातळी पुरुषांच्या शरीरामध्ये 50 पेक्षा जास्त तर स्त्रियांमध्ये 40पेक्षा जास्त असावी.
बऱ्याच संशोधनातून असे दिसून आले आहे की,केवळ जाड लोकांनाच कोलेस्ट्रॉलचा धोका असतो असे नाही.खरतर प्रत्येक वर्षी कोलेस्ट्रॉल तपासले पाहिजे.
तज्ज्ञांच्या मते एखादी व्यक्ती सडपातळ असो वा लठ्ठ कोलेस्ट्रॉल शिरांमध्ये जमा होते.यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
असंतुलित आहारामुळे देखील खराब कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे उच्च रक्तदाब आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते जर कोलेस्ट्रॉलची पातळी 150 पेक्षा जास्त वाढली तर शरीरासाठी घातक ठरू शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)