थंडीच्या दिवसांमध्ये रोज अंड खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
अंड्यामध्ये असणारं प्रोटीन, विटामिन आणि मिनरल्स हे घटक शरीराला आवर्शय उर्जेचा पुरवठा करतात.
आहारतज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात दर दिवशी किमान एक ते दोन अंडी खावीत.
विटामिन डी मुबलक प्रमाणात असल्यानं अंडी हाडांना बळकटी देण्यासोबतच मेंदूतील पेशींसाठी पोषक तत्त्वांचा पुरवठा करतात.
अंड्यांच्या सेवनानं शरीरातील हार्मोनल फंक्शनमध्ये संतुलिन ठेवण्यासमवेत वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात.
ओमेगा 3 आणि हाय प्रोटीन असल्या कारणानं अंड्यामुळं शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होण्यासमवेत केसगळतीही कमी होते.