तुम्हाला आरोग्यासंदर्भातील अनेक समस्या असतील तर तुम्हीही झोपेचा 10-3-2-1-0 नियम पाळला पाहिजे.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की झोपेचा 10-3-2-1-0 नियम नेमका आहे तरी काय?
तर परिपूर्ण झोप हवी असेल आणि दिवसभर थकल्यासारखं वाटू नये अशी इच्छा असेल तर तुम्हाला हा झोपेचा 10-3-2-1-0 नियम फायद्याचा ठरु शकतो.
या नियमामधील पहिल्या 10 चा अर्थ असा होतो की झोपण्याच्या 10 तास आधी कॅफेन असलेल्या पदार्थाचं सेवन करु नये. म्हणजेच चहा, कॉफी टाळावी.
नियमामधील 3 चा अर्थ झोपेच्या तीन तास आधी कोणत्याही पद्धतीने मद्य पोटात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
नियमाच्या नावातील तिसरा आकडा म्हणजे 2 चा अर्थ झोपण्याच्या 2 तास आधी सगळी कामं संपायला हवीत.
1 चा अर्थ झोपण्याच्या किमान एक तास आधी सर्व डिजीटल स्क्रीन बंद कराव्यात. म्हणजेच मोबाईल, टीव्ही, टॅब, लॅपटॉप काहीच वापरायचं नाही.
असं केलं तर सकाळी तुम्हाला शून्य वेळा मोबाईलमधील गजरचा स्नूज ऑप्शन वापरावा लागेल. याच अर्थाने नियमाच्या नावात शेवटी शून्य आहे.
काय मग तुम्ही ट्राय करणार का हा झोपेचा 10-3-2-1-0 नियम?
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)