Pregnancy Tips

शारीरिक संबंधानंतर गर्भधारणा होण्यास किती वेळ लागतो?

मासिक पाळी चुकली की...

दर महिन्याला येणारी नियमित मासिक पाळी चुकली की आपण गर्भवती तर नाही हा पहिला प्रश्न आपल्या मनात येतो.

बर्थ कंट्रोल

आज अनेक जण गर्भधारणा टाळण्यासाठी बर्थ कंट्रोल पिल्स (गर्भनिरोधक गोळ्या) किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा वापर करतात.

खास क्षण

लग्नानंतर पती-पत्नीच्या नात्याची पुढची पायरी म्हणजे पालक होणं. मुलांचा जन्म हा प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास क्षण असतो.

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर...

ओव्हुलेशनच्या दिवशी जर तुम्ही शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरच गर्भधारणाची जास्त शक्यता असते.

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS)

नुसार त्यांनी गर्भधारणाची प्रक्रिया सांगितली आहे. ते म्हणतात की, निरोगी जोडप्याने दोन किंवा तीन दिवसांच्या अंतराने नियमितपणे शारीरिक संबंध ठेवल्यास साधारण एका वर्षात गर्भधारणेची शक्यता अधिक असेत.

ओव्हुलेशनची वेळ नेमकी काय?

तज्ज्ञांनुसार मासिक पाळीच्या 14 व्या दिवसापासून ओव्हुलेशन सुरु होतं. अशात अंडी ही 5 ते 6 दिवस निरोगी असतात. तुम्ही या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणाची दाट शक्यता असते.

जर हे वापर असेल तर...

तज्ज्ञ असंही म्हणतात बर्थ कंट्रोल गोष्टी वापर नसला तर तुम्ही कधीही गर्भवती होऊ शकता.

सोप्या शब्दात

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, सेक्सचा पहिला दिवस त्यानंतर 5 दिवसांपर्यंत फर्टिलाईजेशन पिरेड. 6 ते 15 दिवसांपर्यंत गर्भधारणा होते. त्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट सेक्सनंतर साधारण 1 ते 2 आठवड्यानंतर करावी.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञ असंही म्हणतात की, जोडपे शारीरिक संपर्काच्या एकाच दिवशी गर्भधारणा करत नाही. शारीरिक संपर्कानंतर काही मिनिटांत पेशी स्त्रीच्या पेलोफियन ट्यूबमध्ये पोहोचतात. मात्र तेथून बीजांडापर्यंत पोहोचण्यासाठी 6 दिवस लागतात. त्यानंतर हा भ्रूण गर्भाशयात येण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात.

गर्भधारणा प्रक्रिया

थोडक्यात जोडप्याच्या शारीरिक संपर्कानंतर 2 ते 3 आठवड्यांनंतरही गर्भधारणा होऊ शकते. सेल आयुर्मान स्त्री जननेंद्रियामध्ये प्रवेश करणारी पुरुष पेशी 5 दिवसांसाठी व्यवहार्य असते. या वेळेत अंडाशय बाहेर पडल्यास, पुढील 12 ते 24 तासांत गर्भधारणा होईल.

गर्भधारणेची लक्षणं

गर्भधारणेनंतर मासिक पाळी येत नाही हे प्रमुख लक्षण असतं. तसं पाहिलं तर काही स्त्रियांना कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. पण साधारणपणे गर्भधारणेच्या लक्षणांमध्ये जास्त भूक, मळमळ, डोकेदुखी, थकवा, वारंवार लघवी अशी लक्षणं दिसतात. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story