पोटाची वाढलेली चरबी झटक्यात दूर करेल आलं, फक्त असा करा वापर

बदलती जीवनशैलीमुळं तब्येतीच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. यातच लठ्ठपणाही समस्यादेखील वाढत आहे. त्यातच पोटाचा वाढलेला घेर कसा कमी करता येईल यासाठी लोक जीममध्ये मेहनत घेतात. त्याचबरोबर, वेगवेगळे डाएट फॉलो करतात.

पोटाचा घेर कमी करण्यासाठी व वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सोप्पी ट्रिक सांगणार आहोत. ज्यामुळं तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळले.

तुम्हाला माहितीये का आपल्या किचनमध्ये असलेले आलं देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

आल्याचा उपयोग जेवण बनवण्यासाठी व औषध म्हणूनही केला जाऊ शकतो. आल्याचा कोरा चहा तुम्हाला वजन कमी करण्यास उपयुक्त ठरणार आहे.

कृती

आल्याचा चहा बनवण्यासाठी कप पाणी घ्या. पाणी उकळल्यानंतर त्यात आल्याचा तुकडा टाका. आल्याचा अर्क पाण्यात उतरल्यानंतर ते गाळून घ्या. पाणी गाळल्यानंतर त्यात थोडासा लिंबू व अर्धा चमचा मध टाकून हा चहा प्या.

रोज रिकाम्यापोटी हा चहा प्यायल्यास वजन नियंत्रणात राहिल त्याचबरोबर पोटही आत जाण्यास मदत होईल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story