श्रीदेवी यांच्या पहिल्या पतीचे नाव माहितीये का?

हिंदी सिनेसृष्टीतली पहिली सुपरस्टार म्हणून श्रीदेवींची ही ओळख आजतागायत आहे. श्रीदेवी यांनी दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते. मात्र, त्याचवेळी श्रीदेवी यांच्याबाबत आणखी एक चर्चा रंगली होती.

श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांचे हे दुसरे लग्न असल्याचे बोलले जात होते. बोनी कपूर यांच्यासोबत लग्न करण्याआधी त्यांनी एक सिक्रेट वेडिंग केलं होतं, अशा वावड्या उठल्या होत्या

एका मीडिया रिपोर्टनुसार, श्रीदेवी आणि बॉलिवूड अभिनेता मिथून चक्रवर्थी यांनी लग्न केले होते. श्रीदेवी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी मिथून यांनी पत्नी योगिता बाली यांनाही फसवले असल्याची चर्चा आहे.

1984मध्ये रिलीज झालेल्या जाग उठा इन्सान या चित्रपटानंतर दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यानंतरच त्यांनी लग्न केले होते. पण तीन वर्षांतच त्यांचे लग्न तुटले. मात्र, या लग्नाचा कोणताही पुरावा नाहीये.

मिथून चक्रवर्ती यांनी श्रीदेवीसोबत लग्न केल्यानंतर त्यांची पत्नी योगिता बाली यांनी त्यांना आत्महत्या करण्याची कथित धमकी दिली होती.

योगिता बाली यांच्या धमकीनंतर मिथून यांनी श्रीदेवींपासून लांब राहू लागले. त्याचवेळी मिथून आपल्याला कधीच पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही हे लक्षात आल्यानंतर श्रीदेवींनी स्वतःहूनच हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला.

मिथून चक्रवर्ती यांच्यासोबत नाते तोडल्यानंतर श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या नात्याबाबत चर्चा होऊ लागल्या. १९९६ साली दोघांचे लग्न झाले. दोघांनाही दोन मुली आहेत.

VIEW ALL

Read Next Story