मॉर्निंग वॉक करुन आल्यानंतर काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. अशाच 5 गोष्टींबद्दल जाणून घेऊयात...
आपल्यापैकी अनेकजण मॉर्निंग वॉकला आणि व्यायामाला सकाळीच बाहेर पडतात. मात्र वॉक झाल्यानंतरही काही गोष्टी केल्यास त्या वॉकचा अधिक परिणाम होतो ते फार कमी लोकांना ठाऊक असतं.
मॉर्निंग वॉकनंतर अगदी साध्या नियमांचं पालन केलं तरी त्याचा सकारात्मक परिणाम शरीरावर होतो. त्याबद्दल जाणून घेऊयात...
मॉर्निंग वॉकनंतर शक्य तितकं पाणी प्यावं. पुरेश्याप्रमाणामध्ये पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.
मॉर्निंग वॉकनंतर शरीर थकतं. त्यामुळे शरीरामधील पाण्याचं प्रमाणही कमी होतं. त्यामुळेच वॉकवरुन आल्यावर भरपूर पाणी प्यावं.
मॉर्निंग वॉक करुन आल्यानंतर स्ट्रेचिंग नक्की करावी. त्यामुळे पायातील स्नायूंना आराम मिळतो.
मॉर्निंग वॉक केल्याने पायातील स्नायूंमधून ऊर्जा उत्सर्जित होते आणि त्यामुळेच पाय जरा गरम वाटतात. अशावेळेस स्नायूंमध्ये वेदना जाणवतात. स्ट्रेचिंग केल्याने यापासून आराम मिळतो.
मॉर्निंग वॉकनंतर आपलं शरीर थंड राहील असा प्रयत्न करावा. मॉर्निंग वॉकनंतर शरीरामध्ये ऊर्जा तयार होऊन उष्णता बाहेर फेकली जाते.
मॉर्निंग वॉकनंतर शरीरामधून ऊर्जा बाहेर फेकली जाते म्हणूनच वॉक झाल्यानंतर आधी शरीर थंड राहील असा प्रयत्न करावा. याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे काही वेळ शांत बसून रहाणं.
मॉर्निंग वॉकनंतर प्रोटीन शेकचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. पाण्याबरोबरच शरीरातील ऊर्जाही वॉकनंतर कमी होते.
शरीराला पुन्हा ऊर्जा मिळावी यासाठी प्रोटीन शेक प्यावा किंवा एखादं केळं खावं. यामुळे स्नायूंना मजबूत होतात आणि शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्सही मिळतात.
मॉर्निंग वॉकनंतर फळांचं सेवन करणंही फायद्याचं ठरतं. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा आणि व्हिटॅमिन्स मिळतात.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.