फटाक्यांच्या फुटण्याचा आवाज जरी 90 डेसिबलच्या खाली असला तरी अशा हृदयविकारासाठी संबंधित रुग्णांसाठी हे हानीकारक ठरू शकतं.
फटाक्यांच्या आवाजामुळे हृदयरोग्यांच्या समस्या कशा वाढतात, तसेच ते टाळण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया.
हृदयविकार, उच्च रक्तदाबासाठी औषधं घेणाऱ्यांनी मोठ्या आवाजाच्या संपर्कात येणं टाळावं. फटाक्यांच्या आवाजामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता
न्यूरोलॉजिकल समस्यांचा धोका वाढतो, बंद खोलीत राहिल्यानं ध्वनी आणि प्रदूषण टाळणे शक्य होऊ शकतं. ध्वनी,वायू प्रदूषण टाळण्यासाठी दरवाजे,खिडक्या बंद ठेवा
दम लागल्यास, छातीत दुखल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्त आवाजाच्या फटाक्यांपासून दूर राहा.
फटाक्यांच्या धुरामुळे हार्टअटॅक किंवा पक्षाघाताचा धोकाही निर्माण होऊ शकतो. फटाक्यांमध्ये असलेलं शिसे आरोग्यासाठी धोकादायक आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो.
फटाक्यांमधून निघणारा धूर श्वासावाटे शरीरात गेल्यावर रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. मेंदूपर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचत नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा पक्षाघातानं मृत्यू होऊ शकतो.
दिवाळी पर्यावरणपुरक कशी साजरी करता येईल याचा विचार करा...सण साजरा करा मात्र त्यामुळे आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या