कुलदीप यादवनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटर बाबा बागेश्वरच्या चरणी

वर्ल्डकपमध्ये सध्या भारतीय क्रिकेट संघाचा दबदबा आहे. भारतीय संघ सेमी-फायलनमध्ये दाखल झाला आहे.

वर्ल्डकपचा फिव्हर असतानाच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एस श्रीसंत बाबा बागेश्वर धाम यांच्या भेटीला पोहोचला होता.

श्रीसंतने फेसबुकला फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याची पत्नी भुवनेश्वरीही दिसत आहे.

श्रीसंत 2007 मधील T20 आणि एकदिवसीय वर्ल्डकप विजेच्या संघाचा भाग होता.

2007 टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात श्रीसंतने मिसबाहचा झेल घेतला होता, जो आजही क्रिकेटरसिकांच्या लक्षात आहे.

श्रीसंतने भारतासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 169 विकेट्स घेतले.

आयपीएल 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली त्याच्यावर कायमची बंदी घातली होती. पण नंतर ती कमी करत 7 वर्षं करण्यात आली.

VIEW ALL

Read Next Story