ICC Ranking मध्ये नंबर 1 वर पोहोचलेल्या शुभमनला मोडता येतील का अव्वल स्थानी राहण्याचे हे विक्रम?

शुभमन गिल अव्वल स्थानी

अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीमध्ये भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल अव्वल स्थानी आला आहे.

बाबर आझमला मागे टाकलं

शुभमन गिलने बाबर आझमला मागे टाकत हा पराक्रम केला आहे. अवघ्या 41 डावांमध्ये शुभमनने ही झेप घेतली आहे.

सातत्यपूर्ण कामगिरीमुळे पटकावला क्रमांक

वर्ल्ड कपमधील पहिल्या 2 सामन्यांना मुकल्यानंतर शुभमनने संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमाकांचा फलंदाज होण्याचा मान मिळवला.

शुभमन पहिला भारतीय फलंदाज नाही

मात्र अशाप्रकारे आयसीसीच्या बॅटींग रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा शुभमन हा काही पहिला भारतीय फलंदाज नाही. यापूर्वी हा पराक्रम 3 भारतीयांनी केला आहे.

सचिन ठरलेला पहिला खेळाडू

सचिन तेंडुलकर 1-2 नाही तर तब्बल 9 वेळा आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमाकांवर राहिला आहे. त्याने सर्वात आधी 25 फेब्रुवारी 1996 रोजी पहिला क्रमांक पटकावला.

182 आठवडे सचिन होता पहिल्या क्रमांकावर

सचिन त्याच्या करिअरमध्ये सन 2011 नंबर वन फलंदाज झाला तो शेवटचा. मात्र त्यावेळी तो 182 आठवडे त्या क्रमांकावर होता. हा ही एक विक्रम आहे.

धोनीच्या नावावर अनोखा विक्रम

2006 साली धोनी आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज झाला. त्याने केवळ 38 इनिंग्समध्ये हे स्थान पटकावत रिकी पॉइण्टींगचा विक्रम मोडित काढला.

सातत्याने अव्वल 10 मध्ये

धोनी 2010 नंतर कधीच आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आला नाही. पण तो सातत्याने अव्वल 10 मध्ये होता.

2013 मध्ये पहिल्या विराट नंबर एक झाला

विराट कोहलीनेही आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. तो पहिल्यांदा 2013 मध्ये पहिल्या क्रमांकावर आला.

1258 दिवस कोहली पहिल्या क्रमाकांवर होता

विराट कोहलीच्या नावावर पहिल्या क्रमांकावर राहण्याचाही विक्रम आहे. विराट कोहली ऑगस्ट 2017 ते एप्रिल 2021 दरम्यान तब्बल 1258 दिवस या क्रमांकावर होता.

शुभमन मोडणार का हा विक्रम?

आता शुभमन सचिन आणि विराटचे हे सर्वाधिक काळ आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या क्रमाकांवर राहण्याचा विक्रम मोडतो का हे येणारा काळच सांगेल.

VIEW ALL

Read Next Story