तुम्ही कोणतेही पॅक्ड फूड घेणार असाल तर त्याआधी तुम्ही त्यावरची एक्सपायरी डेट पाहणं अत्यंत आवश्यक आहे.
खराब झालेले अन्न हे त्याच्या वासावरून आणि त्याच्या दिसण्यावरून लगेचच समजते तेव्हा त्यासाठी तुम्हाला ते योग्य वेळी तपासणं महत्त्वाचे आहे.
तुम्ही जर का खराब अन्नाचे चुकूनही सेवन केलेत तर तुम्हाला पोषक तत्त्वे कमी मिळतात.
खराब अन्न हे आपल्या पोटासाठी अत्यंत वाईट असते. तुम्हाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
तुम्ही जर का एक्सपायरी गेलेलं अन्न खाल्लात तर तुम्हाला फूड पॉयझनिंगचा त्रास होऊ शकतो. अशावेळी वाया गेलेल्या अन्नातील बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जाऊ शकतात.
तुम्ही एक्सपायर्ड फूड खाल्लंत तर तुम्हाला डायरियाचाही त्रास होऊ शकतो. यामध्ये खकवा, ताप, उलट्या, लूझ मोशन, जीभेची चव जाणे अशी लक्षणे दिसू शकतात.
तुम्हीही जर का पदार्थांवरील एक्सपायरी डेट न पाहताच त्या अन्नाचे सेवन करत असाल तर तुम्हाला ताप आणि उलट्या येण्याचा धोका वाढू शकतो.