आजकाल खराब लाईफस्टाइल आणि खाण्याची पद्धती यामुळे थकवा, अशक्तपणा अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अनेकदा लोक ही फार छोटी समस्या असल्याचं समजत याकडे दुर्लक्ष करतात. पण भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा घालवायचा असेल तर अशावेळी तुम्ही 3 गोष्टींचं सेवन करु शकता.

अंड

अंड्याला प्रोटीनचा एक चांगला स्त्रोत मानलं जातं. निरोगी आरोग्यासाठी अंड महत्त्वाचं असतं.

एका अंड्यात जवळपास 6.3 ग्रॅम प्रोटीन असतं. जर तुम्ही मांसाहारी असाल तर रोजच्या आहारात अंड्याचा समावेश करा.

क्विनोआ

शाकाहारी लोकांना अशक्तपणा घालवण्यासाठी क्विनोआ हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये प्रोटीन, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, फायबर, मॅग्नेशिअम आणि आयर्न असतं.

ऊर्जा आणि स्टॅमिना

हे तुम्हाला ऊर्जा देतं आणि स्टॅमिना वाढवण्यात मदत करतं. क्विनोआला मुख्य किंवा साईड डिश म्हणूनही खाऊ शकता. सूपमध्येही याचा वापर करु शकता.

बदाम

बदाम हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबरचा स्त्रोत आहे. हे तुम्हाला ऊर्जा देतात आणि शक्ती वाढवण्यात मदत करतात.

सकाळी भिजलेले बदाम किंवा रात्री दुधासह बदामाचं सेवन केल्यास शारिरीक अशक्तपणा दूर होतो.

ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. अंमल करण्याआधी डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा.

VIEW ALL

Read Next Story