हाडांचा कर्करोग हा एक धोकादायक आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हा कर्करोग संपूर्ण शरीरात पसरण्याची भीती असते.
हाडांचा कर्करोग हा शक्यतो हात किंवा पायाच्या हाडांपासून सुरू होतो
तुम्हालासुद्धा हाडांच्या कर्करोगापासून सुरक्षित रहायचे आहे तर करा 'हे' उपाय
आवश्यक असेल तरच x-ray आणि सीटी स्कॅनचा वापर करा. लहानवयात याचा वापर करणे टाळा .
शरीराला जास्त लठ्ठ किंवा कमकुवत बनवू नका. तुमचे वजन हे तुमच्या वयानुसार असायला हवे.
दररोज व्यायाम करणे देखील कर्करोगाचा धोका कमी करू शकते. त्यामुळे नियमित व्यायाम करा.
धुम्रपान करणे टाळा. यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश असावा.त्यामध्ये फळ, हिरव्या भाज्यांचा समावेश असावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)