पावसाळ्यात माथेरानला जाताय? दोनदा विचार करा, कारण...

Jul 15,2024

माथेरान

पावसानं जोर धरला असल्यामुळं अनेकांचेच पाय माथेरानच्या दिशेनं वळले. शनिवार - रविवारी तर हे ठिकाण पर्यटकांनी खुलून येतं.

किमान प्रवास

शहरापासून नजीकचं ठिकाण असल्यामुळं या ठिकाणाला अनेकांचीच पसंती. त्यामुळं किमान प्रवासात कमाल मजा करता येते या धारणेनं अनेकांचेच पाय इथं वळतात.

वेगळंच चित्र

वीकेंडच्या दिवशी मात्र इथं सध्या वेगळंच चित्र पाहायला मिळत असून, प्रवासातच अनेकांचा अर्था दिवस व्यर्थ जात असल्यामुळं आता माथेरानला जाण्याआधी दोनदा विचार करण्याची परिस्थिती दिसत आहे.

चार तास अनेक वाहनं ताटकळत

नुकत्याच मागे पडलेल्या वीकेंडला माथेरानच्या घाटामध्ये इतकी वाहतूक कोंडी होती, की 20 मिनिटांच्या या प्रवासामध्ये तब्बल चार तास अनेक वाहनं ताटकळत होती.

Entry Point

माथेरानचा Entry Point असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागाच नसल्यानं घाटात वाहतूक कोंडी होत असल्याची स्थिती उदभवली आहे.

प्रशासन

पर्यटकांना अनेक तास घाटातच अडकावं लागत आहे. ज्यामुळं आता स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे पार्किंगसंदर्भातील जागेसाठी मागणी करण्याचाच सूर अनेकांनी आळवला आहे.

पर्यटक

माथेरान आणि नजीकच्या भागात पर्यटनामुळं अनेकांचाच उदरनिर्वाह चालतो. पण, सततच्या वाहतूक कोंडीमुळं इथं पर्यटक पाठ फिरवू शकतात ही बाबही नाकारता येत नाही.

VIEW ALL

Read Next Story