जर आपणसुद्धा दिवसांतील 8 ते 9 तास सलग डेस्क जॉब करत असाल, तर सर्वात आधी तुमचा डेस्क तुमच्या सोयीनुसार सेट करुन घ्यावा.
जर आपला डेस्क आपल्याला हवा तसा व्यवस्थित सेट व आरामदायी असेल तर आपल्याला मान आणि पाठदुखीचा त्रास होणार नाही.
दर 20 मिनिटांनी डोळे उघडझाप कर, 20 मिनिटे दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, त्याचबरोबर 20 सेकंदांसाठी आपले संपूर्ण शरीर स्ट्रेच करुन घ्यावे.
आपण डेस्कवर बसल्या बसल्या मान, हात, पाय यांसारख्या अवयवांचे आपण स्ट्रेचिंग करु शकता. यामुळे तासंतास तसेच बसून आपले अवयव आखडणार नाहीत.
थोड्या थोड्या वेळाने शरीराची अशी हालचाल होत राहिली तर आपल्याला देखील काम करताना फ्रेश वाटेल. असे केल्याने शरीरातील तणाव दूर होतो आणि मनही शांत राहते.
शांत मनाने दीर्घ श्वास घेतल्याने तणाव कमी होतो. माइंडफुल ब्रिथिंग करण्यासाठी, डोळे बंद करून दीर्घ श्वास भरुन घ्या, श्वास थोडा वेळ रोखून ठेवा, नंतर हळुहळु श्वास सोडा.
शक्य असल्यास, थोड्या थोड्या वेळाने उभे राहा किंवा कामाच्या दरम्यान काही पावले चालत जा. हा उपाय केल्याने स्नायूंवरील दाब कमी होतो.