बदाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. बदामाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतात.
बदामात टॅनिन नावाचे कंपाउंड असते. ते खाल्ल्याने शरीराला बदामाचे पूर्ण पोषणतत्व मिळत नाही. म्हणून सालीसकट बदाम खाऊ नये
बरेच लोक घाईघाईत कोरडे बदाम खातात. असे केल्याने शरीरात पित्ताचे प्रमाण वाढते. ज्यामुळे आजारपण वाढतात.
जास्त बदाम खाल्ल्याने सालीचा काही भाग आतड्यांमध्ये चिकटतो. त्यामुळे पोट दुखणे, जळजळ, गॅस होतो.
ज्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांनी जास्त प्रमाणात खाऊ नये बदाममध्ये हायड्रोसायनिक अॅसिड असते जे श्वसना संबंधित आजार असणाऱ्या लोकांसाठी धोकादायक ठरते.
पचनशक्ती कमी असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात बदाम खाऊ नये नाहीतर त्यांनी जास्त बदाम खाल्ले तर त्यांचं पोट जड होऊ शकतं आणि उलटीचा त्रास होऊ शकतो.
ज्या लोकांना मूतखड्याचा त्रास आहे अशा लोकांनी बदाम खाऊ नये. नाहीतर त्यांचा त्रास जास्त वाढू शकतो.