महाशिरात्रीचा सण हा पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाचा सोहळा आहे. हिंदू धर्मात हा सण भगवान महादेवाला समर्पित आहे.
8 मार्च महाशिवरात्रीला भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करतात.
पण तुम्हाला माहिती आहे का? महाशिवरात्रीला रुद्राभिषेक करणे अतिशय शुभ आणि फलदायी मानले जाते.
धार्मिक शास्त्रात असं म्हटलं की, रुद्राभिषेक केल्याने भक्तांची सर्व इच्छा पूर्ण होते.
महाशिवरात्रीला शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यास सर्व रोगापासून मुक्ती मिळते असं म्हणतात.
रुद्राभिषेक करताना शिवलिंग उत्तर दिशेला ठेवावं आणि रुद्राभिषेक करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्व दिशेला असायला पाहिजे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)