आपल्यापैकी अनेकांना कोळंबी खायला आवडते. चवीबरोबरच या माश्याच्या सेवाने आरोग्यालाही फायदा होतो.
कोळंबी खाल्ल्याने पोटाचा घेर कमी करण्यास मदत होऊ शकते असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना?
तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर कोळंबी तुम्हाला यामध्ये फायद्याची ठरु शकते.
कोळंबीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. त्यामुळेच कोळंबीचं सेवन करणं वजन कमी करण्यासाठी फायद्याच्या ठरतात.
कॅलरीज कमी असल्याने बेझिझक प्रॉन म्हणजेच टायगर कोळंबीचा तुम्ही आहारामध्ये समावेश करु शकता.
कोळंबीमध्ये प्रोटीन अधिक प्रमाणात असल्याने वजन कमी करण्याबरोबरच इतर अनेक गोष्टींसाठीही प्रोटीन फायद्याचं ठरतं.
कोळंबी हा माश्यांपैकी सर्वात लो फॅट फूड असल्याने त्याच्या सेवनाने वजन वाढण्याची शक्यता फारच कमी असते.
त्यामुळेच वजन कमी करण्याबरोबरच हृदयाच्या आरोग्यासाठीही कोळंबी खाणं फायद्याचं असतं.
कोळंबीमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिडही जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे पोटाचा घेर कमी करण्यास मदत होते.
कोळंबी ही व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन ई, व्हिटॅमीन बी-12, व्हिटॅमीन बी 6 आणि फॉस्पोरसचाही उत्तम स्त्रोत आहे. (सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)