गरमीमुळे उन्हाळ्यात थंड पाणी सगळेच जण पितात. मात्र काही जणांना बाराही महिने थंड पाणी पिण्याची सवय असते.
फ्रीजमधलं बर्फाचं पाणी प्यायल्याशिवाय अनेकांची तहान भागत नाही. पण याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो असं तज्ज्ञ सांगतात.
जर तुम्ही तीनही ऋतूत थंड पाणी पित असाल तर, तुंम्हाला पचनाचा त्रास होऊ शकतो.
थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे अन्न पचन होणयास अडथळा होतो.
डॉक्टरांच्या मते, जर तुम्ही वारंवार थंड पाणी पित असाल तर सतत घसा खवखवण्याचा त्रास होऊ शकतो.
तुम्हाला फॅट्स कमी करायचे असतीस तर मैद्याचे पदार्थ खाणं टाळावं त्याचबरोबर थंड पाणी न पिता कोमट पाणी प्यावं असं तज्ज्ञ सांगतात.
थंड पाणी पिण्याच्या सवयीमुळे हृदयविकाराचा धोका संभवतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)