वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने अनेकांना खोकला, सर्दी आणि ताप येतो.
पावसाळ्यात चिखलाच्या पाण्यामुळे रोगराईचं साम्राज्य वाढतं आणि त्यामुळे तापाची साथ वाढते.
तापासोबत सांधेदुखी आणि शरीराच्या इतर भागात दुखणे हे सामान्य होत आहे.
तापामध्ये सांधेदुखीचे कारण म्हणजे शरीराचे टिशू कमकुवत होणे.
सांधेदुखीची समस्या दूर करण्यसाठी फायबर, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम या घटकांचा समावेश आहारात करावा.
वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबत शरीराची मसाजही करावी.
ताप आल्यावरही सांधे आणि शरीराच्या इतर भागात दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)