डायबेटिज असल्यास आंबा खाऊ शकतो का?

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा फक्त फक्त चवीत नाही तर अनेक कारणांसाठी चांगला असतो.

आंब्यात अनेक गुणसत्व

आंब्यात व्हिटॅमिन ए, सी, फायबर, फोलेट आणि पोटॅशिअमसारखे अनेक गुणसत्व असतात.

आंबा खाल्ल्यास शरिरातील साखर वाढते?

आंबा गोड असल्याने अनेकदा डायबेटिजने त्रस्त असणारे तो खाणं टाळतात. आंबा खाल्ल्यास शरिरातील साखर वाढेल अशी भीती त्यांना असतं.

डायबेटिजचे रुग्ण आंबा खाऊ शकतात, पण....

पण तज्ज आणि डायटिशियन यांच्या म्हणण्यानुसार, डायबेटिजचे रुग्ण आंबा खाऊ शकतात. फक्त त्यांनी किती प्रमाणात खात आहोत याचं भान ठेवणं गरजेचं आहे.

..तर मात्र आंब्याचं सेवन करणं टाळा

जर तुमची साखरेची पातळी नेहमी जास्त राहत असेल तर मात्र आंब्याचं सेवन करणं टाळा.

हुशार पद्धतीने डाएटमध्ये समावेश करा

पण जर तुमची साखर नियंत्रणात असेल तर कमी प्रमाणात आंबा खाऊ शकता. तुम्हाला हुशार पद्धतीने आपल्या डाएटमध्ये त्याचा समावेश करावा लागेल. जेणेकरुन तुम्हाला चवही चाखण्यास मिळेल आणि प्रकृतीही चांगली राहील.

न्यूट्रिशिअन्स काय सांगतात?

न्यूट्रिशिअन्स सांगतात की, डायबेटिज रुग्णांनी आंबा खावा, मात्र त्यासह असा कोणता पदार्थ खाऊ नये ज्यामुळे हाय कार्ब्स वाढतील.

अर्धा कप आंबा खाणं सुरक्षित

डायबेटिज रुग्णांनी रोज 50 ते 75 ग्रॅम म्हणजे अर्धा कप आंबा खाणं सुरक्षित आहे.

मँगो शेक आणि रस टाळा

डायबेटिजच्या रुग्णांनी मँगो शेक किंवा याचा रस पिण्यापासून वर्ज्य केलं पाहिजे. याचं कारण यात फार साखर असते.

VIEW ALL

Read Next Story