दिवसभर थकवल्या नंतर रात्री झोप येणं यापेक्षा चांगले काय असू शकते?
आरोग्य तज्ञांच्या मते, बहुतेक लोकांना झोपायला 5 ते 20 मिनिटे लागतात. पण प्रत्येकाचे शरीर वेगळं असते
बेडवर पडल्या पडल्या लगेच झोपणं तुम्हाला चांगलं वाटत असेल, परंतु हे गंभीर आजाराचं लक्षण आहे
बेडवर पडल्यानंतर लगेच झोप लागणं हे देखील अपूर्ण झोपेचे लक्षण आहे.
याचं आणखी एक कारण म्हणजे योग्य झोप न लागणं. झोपेत असताना अनेक वेळा झोपमोड झाल्यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही त्यामुळे लगेच झोप येऊ लागते.
अनेकदा औषध किंवा नैराश्यामुळे बेडवर पडल्यानंतर लगेच झोप येते आणि नैराश्यामुळेही जास्त झोप येते
लवकर झोप लागण हे स्लीपिंग डिसऑर्डरमुळे देखील होऊ शकते. जर तुम्ही 6 तासांपेक्षा कमी झोपत असाल, तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, त्यामुळे तुम्हाला लवकर झोप येऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि नैराश्याचा धोका वाढतो. म्हणूनच नेहमी 7-8 तासांची झोप घ्या