लहान मुलं असो वा प्रौढ सर्वांनाच पॉपकॉर्न खायला आवडते.बहुतेक लोक जेव्हा कमी भूक लागते तेव्हा पॉपकॉर्न खाणं पसंत करतात.
भारतात सहजपणे आढळणारे पॉपकॉर्न ऊर्जा देण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करतात.पण अनेकवेळा मधुमेहाच्या रूग्णांना प्रश्न पडतो की, साखर असेल तर पॉपकॉर्न खाऊ शकतो का?
आहारतज्ज्ञांच्या मते मधुमेहाच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स(GI) असलेल्या पदार्थांच सेवन करावं. रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी ग्लायसेमिक इंडेक्स जबाबदार आहे.
पॉपकॉर्नमध्ये अंदाजे 55 GI आहे.याचा अर्थ असा की रक्तातील साखरेची पातळी कमी वेगाने वाढते.
पॉपकॉर्नमध्ये कॅलरीज आणि फायबरच प्रमाण अधिक असते त्यामुळे जर ते कमी प्रमाणात खाल्ले तर मधुमेहाच्या रूग्णांसाठी योग्य आहार ठरू शकतो.
हे कॉर्न कर्नलपासून तयार केलेले ताजे पॉपकॉर्न घरी खाऊ शकतो. पण आजकाल पॅकबंद पॉपकॉर्न बाजारात पॅकेटमध्ये मिळतात.यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात. त्यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी पॅकबंद पॉपकॉर्न खाऊ नये.
मधुमेहाच्या रूग्णांनी पॉपकॉर्नचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
त्याचबरोबर मधुमेहाच्या रूग्णांनी बटर लावलेले पॉपकॉर्न खाऊ नये. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)