Tata ची कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी; दमदार गाड्यांची बुकिंग सुरु

Jan 25,2024

देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने देशात पहिल्यांदा अशी कार लाँच केली आहे, ज्यामध्ये CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळत आहे.

टाटा मोटर्सने आपल्या नव्या Tiago आणि Tigor iCNG च्या ऑटोमॅटिक व्हेरियंट्सची अधिकृत बुकिंग सुरु केली आहे.

ग्राहक अधिकृत वेबसाईट आणि डिलरशिपच्या माध्यमातून कार बूक करु शकतात.

ग्राहक अधिकृत वेबसाईट आणि डिलरशिपच्या माध्यमातून कार बूक करु शकतात.

फक्त 21 हजारात या कार तुम्ही बूक करु शकता. लवकरच या दोन्ही कार लाँच केल्या जाणार आहेत.

Tigor iCNG AMT ला कंपनी एकूण 3 व्हेरियंट्समध्ये सादर करत आहे. तर Tigor iCNG AMT फक्त दोन व्हेरियंटमध्ये आहे.

या गाड्यांमध्ये कंपनी ट्वीन सिलेंडर तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. ज्यामध्ये दोन छोटे सिलेंडर आहेत. यामुळे अधिक बूट स्पेस मिळतो.

याशिवाय या कारमध्ये अॅडव्हान्स ECU तंत्रज्ञान मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही सहजपणे सीएनजी आणि पेट्रोल मोड स्विच करु शकता.

या गाड्यांची खास बाब म्हणजे त्या थेट CNG वर सुरु होतील. इतर ब्रँडच्या गाड्यांप्रमाणे पेट्रोल स्टार्टची गरज नाही.

सुरक्षेसाठी फ्यूएल कॅपच्या आत मायक्रो स्वीच देण्यात आला आहे. म्हणजे रिफिलिंगच्या वेळी स्विच कारच्या इंजिनला बंद करेल.

याशिवाय iCNG किटमध्ये अॅडव्हान्स मटेरियल वापरलं जात आहे. जे कोणत्याही लीकपासून कारला वाचवतो. यामध्ये लीक डिटेक्शन फिचरही देण्यात आलं आहे.

VIEW ALL

Read Next Story