ॲव्होकॅडो हे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेचे फळ असून ते भारतातही मोठ्या शहरांमध्ये सहज मिळतं. हे फळ अगदी नाशपाती सारखे दिसतं. या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.

Jun 12,2024

ॲव्होकॅडोची शेती

हे फळ ज्या ठिकाणी 20 ते 35 अंश सेल्शिअल तापमान असलेल्या भागात लागवड करण्यात येते. या फळासाठी 60 ते 70 टक्के आर्द्रतेची गरज असते.


ॲव्होकॅडो फळाचं रोप लावल्यानंतर त्याला 5 ते 6 वर्षांनंतर फळं येतं. हे अॅव्होकॅडो फळं तुम्हाला हिरव्या आणि जांभळ्या रंगात मिळतं.

ॲव्होकॅडोची किंमत

ॲव्होकॅडोच्या एका झाडावर साधारण 250-500 फळं लागतात. तर हे फळं खरेदी करायचं असेल तर प्रति किलो 350-550 रुपये खर्च करावे लागतात.

मधुमेहासाठी फायदेशीर

मधुमेहाची समस्या असणाऱ्यांनी ॲव्होकॅडोचे सेवन केल्यास इन्सुलिनला चालना मिळते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहण्यास मदत मिळते.

मजबूत हाडे

त्याशिवाय या फळात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्याने ते हाडे मजबूत करण्यास फायदेशीर ठरतं.

दूरदृष्टी

ॲव्होकॅडो या फळाचं सेवन केल्याने दूरदृष्टी सुधारते आणि डोळ्याच्या इतर समस्यांवरही फायदा मिळतो.

हृदय निरोगी राहण्यास मदत

ॲव्होकॅडोमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास आणि एचडीएलचे प्रमाण वाढविण्यास मदत करतं. त्यामुळे आपलं हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story