कॅप्टन बदलला.. संघ बदलला.. तरी देखील पाकिस्तानचं पालथ्या घड्यावर पाणी, अशीच परिस्थिती दिसतीये.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सुमार कामगिरीमुळे पाकिस्तानला येत्या काळात नवा कॅप्टन मिळण्याची शक्यता आहे.
एकीकडे पीसीबीमध्येच वाद सुरू असताना आता बाबर आझमच्या जागी कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
मोहम्मद रिझवान यावर पाकिस्तान डाव लावण्याची शक्यता आहे. संघावर त्याचं प्रभूत्व पाहता त्याला संधी दिली जाऊ शकते.
पाकिस्तान पुन्हा शाहिन अफ्रिदीला संघाची जबाबदारी देऊ शकते. पीएसएलमध्ये त्याने दोनदा विजेतेपद पटकावलंय.
पाकिस्तानचा ऑलराऊंडर शाबाद खान याच्यावर पीसीबी डाव लावू शकते. गेली अनेक वर्ष उपकर्णधार म्हणून तो जबाबदारी सांभाळतोय.