दरवर्षी 7 जुलैला आंतरराष्टीय चॉकलेट दिवस साजरा केला जातो. चॉकलेट हे चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे हे तुम्हाला माहित आहे को ?
चॉकलेटमध्ये जीवनसत्व आणि खनिजे असतात. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
चॉकलेटच सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते.
चॉकलेटचे सेवन करणं हृदयासाठी फायदेशीर आहे. पण जर तुम्ही डार्क चॉकलेटच सेवन करत असाल तर ते प्रमाणात खावे तरच याचा हृदयावर चांगला परिणाम होतो.
चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात.ज्यामुळे पेशींचे नुकसान होत नाही. त्याबरोबर चॉकलेटमध्ये असलेलं कोको हे एक प्रीबायोटिक आहे ज्यामुळे पोटातील बॅक्टेरिया पचवण्यास मदत होते. त्याचबरोबर कॅन्सरपासून तुमचे संरक्षण होते.
चॉकलेटमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे भूक कमी लागते.तसेच चॉकलेटचं सेवन केल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हाला कधी एखाद्या कामाचा ताण असेल तर चॉकलेट खाणं तुमचा तणाव दूर करू शकते. चॉकलेटमध्ये असलेले कॉर्टिसॉल म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते आणि तणाव झपाट्याने कमी होण्यास मदत होते.