नेमकं काय करावं?

शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नेमकं काय करावं? तर पुरेसं पाणी प्यावं. असे सल्ले अनेकजण देतात. पण, पाणीही घातक ठरू शकतं हे तुम्हाला माहितीये का?

Aug 07,2023

समजून घ्या...

Water Toxicity हा त्यातलाच एक प्रकार. जिथं कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पाणी प्यायल्यानं ही परिस्थिती उदभवते.

उत्सर्जन प्रक्रिया

शरीरातील पाणी उत्सर्जन प्रक्रियेतून बाहेर न पडल्या आणि सातत्यानं पाणी पित राहिल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होण्यास सुरुवात होऊन शरीर Over Hydration चा शिकार होतं.

लक्षणं

Water Toxicity च्या लक्षणांबाबत सांगावं तर, डोकेदुखी, मळमळ, उलटी येणं, गोंधळ उडणं, स्नायू कमकुवत होणं अशा गोष्टी जाणवू लागतात. ही परिस्थिती आणखी बिघडूही शकते.

पाण्याची गरज

प्रत्येक व्यक्तीचं वय, वजन, त्यांची शारीरिक मेहनत, हवामान आणि एकंदर आरोग्यावरूनच त्यांच्या शरीराच्या पाण्याची गरज ठरते. परिणामी सर्वांना पाण्याचं समप्रमाण लागू होत नाही.

कमी वेळात जास्त पाणी नकोच

व्यायाम करणारी मंडळी आणि खेळाडूंनी पाणी प्यावं. पण, कमी वेळात जास्तीत जास्त पाणी पिणं जाणीवपूर्वक टाळावं.

शरीराचा इशारा लक्षात घ्या

तहान लागण्याचा शरीराचा इशारा लक्षात घ्या, जेव्हा तहान लागली नसेल तेव्हा पाणी पिणं टाळा.

तहान

ज्यावेळी तुम्हाला भरपूर तहान लागली असेल तेव्हा पाण्याचे लहान घोट घ्या. पाणी अती वेगानं पिणं टाळा.

मद्यपान टाळा

मद्य, कॅफिन असणारी पेय पिणं टाळा. याचे शरीरावर वाईट परिणाम होतात.

डॉक्टरांची मदत घ्या

तुमच्या आजुबाजूला कोणामध्ये Water Toxicity ची लक्षणं आढळल्यास तज्ज्ञ/ डॉक्टरांची मदत घ्या. योग्य वेळी सावध व्हा आणि संभाव्य धोका टाळ. (सर्व छायाचित्रे- फ्रीपिक/ वरील माहिती सामान्य संदर्भांआधारे घेतली असून, डॉक्टरांचा सल्ला कधीही महत्त्वाचा.)

VIEW ALL

Read Next Story