हिंदू धर्मात कोणत्याही पूजेत प्रथम स्थान हे गणपतीचे असते. 'प्रथम तुला वंदितो' असे आपण गणेशाला उद्देशून म्हणतो.
गणपतीला 'बुद्धीची देवता' म्हणतात. गणेश किंवा गणपती हा शंकर आणि पार्वती यांचा पुत्र आहे . तर, कार्तिकेयचा धाकटा भाऊ.
'गणेश' या शब्दाची उत्पत्ती दोन शब्दांना जोडून झाली आहे. हा शब्द 'गण' आणि 'ईशा' ( ईश ) या दोन शब्दांच्या संधीतून तयार झाला आहे.
'गण' या शब्दाचा अर्थ लोक, जनता, सामान्य माणसं किंवा समुदाय असा आहे.
'ईशा' ( ईश ) या शब्दाचा अर्थ देवता, स्वामी, परमेश्वर , ईश्वर असा आहे.
गण+ईश म्हणजे 'गणेश' या जोडाक्षराचा अर्थ जनांची देवता , सामान्य लोकांचे दैवत असा आहे.
गणेशाची आणखीही बरीच नावे आहेत. ही नावं म्हणजे विघ्नहर्ता , गणनायक , गणराज , गणेश्वर, गजानन.