Spider-Man: Across the Spider-Verse या सिनेमावर बऱ्याच देशात Lebanon, Kuwait, Oman, Saudi Arabia, Bahrain याचबरोबर इतर अनेक देशात बंदी घातली गेली आहे. कारण या सिनेमात ट्रान्सजेंडर ध्वज आहे .ज्यावर "प्रोटेक्ट ट्रान्स किड्स" असं वाक्य लिहीलं गेलं आहे.

13 ऑगस्ट 2023 रोजी बार्बी सगळीकडे प्रदर्शित झाला. मात्र या सिनेमाला अनेक ठिकणी बंदी घातली गेली. या सिनेमाला Pakistan, Qatar, Russia, Algeria सहित अनेक देशात चित्रपटगृहांमध्ये बंदी घातली गेली, 19 जुलै रोजी रिलीज झाल्यानंतर फक्त तीन आठवड्यांनंतर. रॉयटर्सनुसार, एका अधिकृत स्त्रोताने असं म्हटलं आहे की, हा सिनमा "समलैंगिकता आणि इतर पाश्चिमात्या विचारसरणीला प्रोत्साहन देते. " आणि ते "या देशांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वासांचे पालन करत नाही."

हंसल मेहता दिग्दर्शित 'फराज-फराज' 3 फेब्रुवारी 2023 रोजी भारतात प्रदर्शित झाला आणि समीक्षकांकडून या सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. हा चित्रपट 2016 च्या ढाका हल्ल्यावर आधारित आहे ज्यात 20 ओलिस, दोन पोलीस अधिकारी, पाच बंदूकधारी आणि दोन बेकरी कामगारांसह 29 लोक मारले गेले होते. 1 जुलै 2016 रोजी होली आर्टिसन हल्ल्यात अतिरेक्यांनी मारलेल्या अबिंता कबीरची आई रुबा अहमद यांनी 12 फेब्रुवारी 2023 रोजी पुर्नविचार याचिका दाखल केली होती. त्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती मोहम्मद खसरुझमान आणि न्यायमूर्ती मोहम्मद इक्बाल कबीर यांच्या खंडपीठाने या दिशाभूल करणाऱ्या चित्रपटावर बांग्लादेशमध्ये बंदी घालण्याचे आदेश दिले.

कंबोडियामध्ये ''नो मोअर बेट्स' या सिनेमावर कंबोडियाची प्रतिमा आणि प्रतिष्ठेला नुकसान पोहचवल्याबद्दल बंदी घालण्यात आली.

'विनी द पूह: या सिनेमाची मुख्य भूमी चीनमध्ये आणि हाँगकाँग बंदी घालण्यात आली. यासिनेमात रक्त आणि मध दाखवण्यास बंदी आहे. त्यामुळेच या सिनेमाला इथे बंदी घालण्यात आली.

महंतन प्रकल्प आणि हिरोशिमा आणि नागासाकी या दोन्ही अणुबॉम्बस्फोटांबद्दलच्या चित्रपटामुळे 'ओपेनहायमर'वर जपान रशिया तसंच अनेक देशात बंदी घालण्यात आली कारण हा जपानमधील संवेदनशील मुद्दा आहे.'

'मॅचेटे' या सिनेमावर युक्रेनमध्ये बंदी घालण्यात आली होती कारण त्याच्या सह-कलाकारांपैकी एक, स्टीव्हन सीगलने युक्रेनियन अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय रशियन ताब्यादरम्यान क्रिमियाला भेट दिली होती, ज्यामुळे त्याला देशातून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं.

VIEW ALL

Read Next Story