'...म्हणून मी पुन्हा साडी नेसायला लागले'

प्राजक्ता माळीने स्वतःच केला खुलासा!

Aug 27,2023

प्राजक्ता माळी

मराठी कलाक्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात प्राजक्ताला नेहमी हसऱ्या चेहऱ्यात पाहिलं असेल.

चुलबुली अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीची चुलबुली अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. प्राजक्ताचा पारंपरिक लूक पाहून अनेकांचं काळीज धडधड करतं.

साडीच का?

रेड कार्पेटसाठी साडीच का परिधान करते? असा सवाल प्राजक्ता माळीला विचारला गेला होता. त्यावर तिने रोखठोक उत्तर दिलं.

वेस्टर्न ड्रेस

आतापर्यंत मला असं वाटायचं की पुरस्कार सोहळ्यांसाठी फक्त गाऊन, वेस्टर्न ड्रेसच परिधान केले पाहिजे.

अभिनेत्रींचे कपडे

कारण अशा कार्यक्रमांसाठी अभिनेत्रींनी अशाप्रकारचे कपडेच परिधान करणं अपेक्षित असतं, असं प्राजक्ता म्हणते.

भारी दिसतो

पण आता मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं आपण ज्यामध्ये भारी दिसतो तेच कपडे परिधान केले पाहिजे.

साडी नेसायला आवडतं

मला साडी नेसायला आवडते, कार्यक्रमात वावरताना मला साडीत रहायला आवडतं. म्हणून मी पुन्हा साडी नेसायला लागले, असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे.

VIEW ALL

Read Next Story