सुपर मॉडेलचा संरक्षण मंत्र्यांबरोबर वाद

अमेरिकी सुपर मॉडेलचा संरक्षण मंत्र्यांशी नेमका कशावरुन वाद झाला आणि हे दोघे एकमेकांना काय म्हणाले पाहूयात...

बेला आणि त्या मंत्र्याचा वाद

सोशल मीडियावर अमेरिकन सुपर मॉडेल बेला हदीद आणि इस्रायलचे राष्ट्रीय संरक्षण मंत्री बेन गविर यांच्यात वाद झाला.

बेधडकपणे मांडते म्हणणं

बेला ही अमेरिकेबरोबरच जागतिक फॅशन इंडस्ट्रीमधील आघाडीची मॉडेल असून अनेक ती तिच्या न्यूड फोटोशूट मुळे चर्चेत असते. आलिशान ब्रॅण्ड्सबरोबर तिचं टायअप आहे. तरीही ती आपलं म्हणणं बेधडकपणे मांडते.

इस्रायलच्या मंत्र्यावर टीकेची झोड

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये वाद असून दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांचा पायउतार करत असतात. सुपर मॉडेल बेलानेही इस्रायलच्या मंत्र्यावर टीकेची झोड उठवली आहे.

पॅलेस्टाईन समर्थक

बेला ही इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन वादात पॅलेस्टाईन समर्थक आहे. तिने अनेकदा उघडपणे यावर भाष्य केलं आहे.

..म्हणून बेला इस्रायलविरोधक

बेलाचे वडील हे पॅलेस्टाईनचे असल्याने ती इस्रायलविरोधक आहे.

वंशवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या एका विधानावर बेलाने आक्षेप घेत हे विधान वंशवादाला प्रोत्साहन देणार असल्याचं म्हटलं.

द्वेष पसरवणारं विधान

यावर इस्रायलचे संरक्षण मंत्री बेन गाविर यांनी उत्तर देताना बेलाचं विधान हे द्वेष पसरवणारं असल्याचा दावा केला.

वादाचा मुद्दा ठरला ती बंदी

बेला आणि बेन गविर या दोघांमध्ये झालेला वाद हा वेस्ट बँक येथे इस्रायलच्या वस्त्यांच्या आसपास प्रेवश बंदीच्या मुदद्यावरुन झाला आहे. याविरोधात एक पॅलेस्टाईन नागरिक सातत्याने आवाज उठवत आहे.

वाद कशावरुन झाला?

इस्रायलच्या संरक्षण मंत्री बेन गविर यांनी यहूदिया आणि सामरिया येथील रस्त्यांवर प्रवास करण्याचा हक्क मला, माझ्या पत्नीला आणि मुलांना आहे. यावरुनच वाद निर्माण झाला आहे.

यापूर्वीही अनेकदा केलं आहे समर्थन

बेला हदीदने यापूर्वी अनेकदा उघडपणे पॅलेस्टाईनचं समर्थन केलं आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळजवळ 6 कोटी फॉलोअर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story