Literally प्रवाहाच्या विरुद्ध

Literally प्रवाहाच्या विरुद्ध; भारतातील 'या' नद्या उलट दिशेनं वाहतात Peninsular River या विभागात येणाऱ्या नद्या देशाच्या पश्चिम घाटातून वाहतात. भारतातील एकूण सर्वच नद्यांविषयी सांगावं तर, या नद्यांना पूजनीय स्थान प्राप्त आहे.

अनेक मोठ्या नद्या

अनेक मोठ्या नद्या देशातून वाहतात. देशाच्या विविध प्रांतांना समृद्ध करत वाहणाऱ्या या नद्यांना तितकीच विविध नावंही देण्यात आली आहेत.

पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात

एक बाब पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की, या नद्या सहसा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना दिसतात.

बंगालचा उपसागर

सहसा भारतातील या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात. ज्यामध्ये गंगा, यमुना अशा जवळपास सर्व नद्यांचा समावेश आहे.

दोन नद्या

देशात अशा दोन नद्याही आहेत ज्या शब्दश: प्रवाहाच्या विरुद्ध अर्थात उलट दिशेनं वाहतात.

आठवतायत का या नद्यांची?

देशातून उलट दिशेनं वाहणाऱ्या या नद्या पूर्वेपासून पश्चिमेला जातात. नावं आठवतायत का या नद्यांची नावं?

अरबी समुद्र

हे खरंय, या नद्या बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्राशी एकरुप होतात

कुठून वाहते ही नदी?

विरुद्ध दिशेनं वाहणाऱ्या या नद्यांमधील एकीचं नाव आहे, नर्मदा. ही नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून वाहते.

उलट दिशेनं वाहणारी नदी

देशातील उलट दिशेनं वाहणारी दुसरी नदी आहे तापी. ही नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहते.

VIEW ALL

Read Next Story