धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीशी कसं आहे हेमा मालिनी यांचं नातं?

धर्मेंद्र यांचं वैवाहिक आयुष्य आजही बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. याचं कारण धर्मेंद्र यांनी दोन लग्नं केली आहेत.

विवाहित असतानाही दुसरं लग्न

धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी पहिलं लग्न केलं. पण विवाहित आणि बाप असतानाही धर्मेंद्र यांचा हेमा मालिनी यांच्यावर जीव जडला होता. यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.

प्रकाश कौर यांना दुसऱ्या लग्नाने बसला होता धक्का

धर्मेद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्या पत्नीला मोठा धक्का बसला होता. प्रकाश कौर यांनी एका जुन्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता.

हेमा मालिनी- प्रकाश कौर कधीच एकत्र दिसल्या नाहीत

धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि प्रकाश कौर कधीच एकत्र दिसलेल्या नाहीत. पण एकदा आपण प्रकाश कौर यांच्यासमोरुन गेलो होतो असं हेमा मालिनी यांनी सांगितलं.

हेमा मालिनी यांच्या बायोग्राफीत उल्लेख

हेमा मालिनी यांनी आपल्या बायोग्राफीत सांगितलं होतं की, आपण कधी खासगी नाही मात्र सार्वजनिक ठिकाणी प्रकाश कौर यांना भेटलो आहोत.

लग्नाआधी हेमा मालिनी आणि प्रकाश कौर यांची भेट

धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी नेहमीच त्यांच्या पहिल्या कुटुंबापासून अंतर ठेवलं. पण लग्नाआधी हेमा मालिनी अनेकदा प्रकाश कौर यांना भेटल्या होत्या.

पुस्तकात उल्लेख

याबद्दल हेमा मालिनी यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नव्हता.

"धर्मेंद्र यांनी बाप होण्याचं कर्तव्य पूर्ण केलं"

"धर्मेंद्र यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी जे केलं त्यात मी आनंदी आहे. त्यांनी एक चांगला बाप होण्याचं कर्तव्य पूर्ण केलं आहे. मी त्यातच आनंदी आहे".

"मी प्रकाश कौर यांचा फार आदर करते"

"मी एक वर्किंग महिला आहे. मी आपला आत्मसन्मान कायम ठेवते. मी कधीही प्रकाश कौर यांच्याबद्दल बोललेले नाही, पण मी त्यांचा फार आदर करते"

"जगाने आमच्या खासगी आयुष्यात डोकावू नये"

"माझ्या मुलीही धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचा आदर करतात. जगाला आमच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, पण ही त्यांना माहिती व्हावी अशी गोष्ट नाही"

हेमा मालिनी-प्रकाश कौर कधीच भेटल्या नाहीत

धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी कधीच प्रकाश कौर यांची भेट घेतलेली नाही.

VIEW ALL

Read Next Story