बऱ्याचदा मराठी चित्रपटांमध्ये गणेशाचा उल्लेख आपल्याला ऐकायला मिळतो. गणेश चतुर्थी निमीत्त हे 5 चित्रपट नक्की बघा .
वडील आणि मुलगा हे नाते जरा गुंतागूंतीचे असते . या नाजूक विषयाला या सिनेमात फार सहज हाताळले आहे . चित्रपटाची निर्माती प्रियांका चोप्रा आहे. अशुतोष गोवारीकर, विजू खोटे, सुकन्या मोने, आदी कलाकार चित्रपटात आहेत . परिवाराबरोबर बसून आवर्जुन बघावा असा चित्रपट आहे.
या चित्रपटाला लोकांचे फार प्रेम मिळाले . 2011 साली हा प्रदर्शित झाला होता . संतोष जुवेकर , चिन्मय मांडलेकर , दिलिप प्रभावळकर आदी कलाकार चित्रपटात आहेत . सिनेमाची गाणी फारच गाजली . गणेश मंडळांच्या अवतिभोवती फिरणारा विषय आहे .
2004 ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजरामर सिनेमांपैकी एक मानला जातो . अशोक सराफ , सचिन पिळगावकर , सुप्रिया पिळगावकर आदी कलाकारांवर प्रेशकांनी प्रेमाचा वर्षाव केला . गणपतीला बोललेला नवस पुर्ण करण्यासाठी खटाटोप करणाऱ्या जोडप्याची ही गोष्ट आहे .
सचिन पिळगावकर , वंदना पंडित यांनी चित्रपटात चोख भुमिका साकारली आहे . अष्टविनायकांचे दर्शन चित्रपटात घडेल . आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही मानसिकतांची बाजू या सिनेमात मांडलेली आहे .
एकत्र कुटूंबात गणपती बसवायचा म्हटलं ,की भांड्याला भांड लागतचं . पण मग ती परिस्थिती हाताळून सर करणं महत्त्वाचं असतं . असा विषय मांडणारा सिनेमा नविनच प्रदर्शित झाला आहे . चित्रपटात निकीता दत्ता , भुषण प्रधान , अजिंक्य देव आदी कलाकार चित्रपटात आहेत .