प्रेशर कुकरमध्ये चुकूनही शिजवू नका 5 पदार्थ

प्रेशर कुकरमध्ये जेवण झटपट तयार होतं म्हणून सध्या प्रेशर कुकरचा वापर प्रत्येक घरामध्ये केला जातो.

मात्र अनेकदा लोक सर्वच पदार्थ सरसकट प्रेशर कुकरमध्ये शिजवतात मात्र यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो.

भाज्या :

कुकरमध्ये भाज्या शिजवण्याची चूक कधीही करू नका. भाज्यांमध्ये खनिजे, व्हिटामिन्स सारखी अनेक पोषक तत्वे असतात मात्र कुकरमध्ये शिजवल्याने त्यातील पोषकतत्वे निघून जातात. म्हणून भाज्या कढईत किंवा टोपात शिजवाव्यात.

मासे :

मासे कधीही प्रेशर कुकरमध्ये शिजवू नका. प्रेशर कुकरमध्ये मासे प्रमाणाबाहेर शिजू शकतात ज्यामुळे पदार्थ बिघडू शकतो.

भात :

अनेकजण कुकरमध्ये भात शिजवतात, पण हे चांगलं नाही. जेव्हा भात कुकरमध्ये शिजवला जातो तेव्हा भातातील स्टार्च एक्रिलामाइड नावाचे रसायन बाहेर सोडले जाते जे आरोग्यासाठी चांगले नाही.

पास्ता :

काहीजण पास्ता हा प्रेशर कुकरमध्ये शिजवतात. परंतु यामुळे स्टार्चची मात्रा अधिक वाढते, म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पास्ता हा नेहमी कढईत बनवावा.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story