सध्याच्या काळात, ओटीटीवर कितीही वेबसिरिज आल्या तरी जुन्या मालिकांशी असलेली प्रेक्षकांची नाळ आज देखील तितकीच आहे.
साराभाई विरुद्ध साराभाई या मालिकेने 2004 ते 06 ही दोन वर्ष चांगलीच गाजवली. या मालिकेतील माया साराभाई या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी पसंती दिली.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालितेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.दया जेठालालच्या 'सही पकडे है' या संवादाने अभिनेत्री दिशा वकाणीला वेगळी ओळख दिली.
'कसोटी जिंदगी की' मालिका म्हटलं की आठवतं ते श्वेता तिवारी, एकता कपूर आणि कोमोलिकाची भुमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया. कोमोलिकाची स्टाईल आणि तिच्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
शिवाजी साटम लक्षात राहतात ते एसीपी प्रद्युम्न या भुमिकेमुळेच. 'सीआयडी' मालिकेतील सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहतील.
2000 ते 01 यादरम्यान सुरु असलेल्या 'सोनपरी' मालिकेचा चाहता वर्ग आजही आहे. अभिनेत्री मृणास कुलकर्णीला आजही सोनपरीमुळे ओळखतात.
'बालिका वधू' मालिकेतून घराघरात पोहोचलेलीअविका गौर हिला आज ही आनंदी या भूमिकेमुळे जास्त ओळखतात.
एक मॅजिक पेन्सिल काय काय करु शकते, हे 'शक लाका बूम बूम' मालिकेत दाखवलं गेलं. या मालिकेमुळे तशा पेन्सिल्स देखील बाजारात आल्या होत्या. आजही त्या पेन्सिलला मॅजिक पेन्सिल म्हणतात.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतल्या जेठालालची विनोदी भूमिका प्रेक्षकांना कायमच खळखळून हसवलं आहे.
इंजिनियर विक्रमने करिष्मा नावाच्या एका रोबोट असलेल्या मुलीचा शोध लावला. इतर मुलांपेक्षा वेगळी ही मुलगी वेगळी होती. या करिष्माच्या करिष्मावर प्रेक्षक आजही तेवढंच प्रेम देतात.
दूरदर्शनवरील ही मालिका इतके वर्ष लोटून ही आजही लोकप्रिय आहे. मुकेश खन्ना यांना शक्तीमानच्या भूमिकेमुळे वेगळी ओळख मिळाली.